Why Do Children Bite Others?

मुलं चावत का? आणि ते कसं थांबवायचं?

As a parent, seeing your child bite another child can be upsetting and even embarrassing. You might wonder, “Why is my child behaving like this?” or “Is there something wrong?” But rest assured, biting is a common phase in early childhood, and most children outgrow it with time and guidance.

पालक म्हणून, जर तुमचं मुलं दुसऱ्या मुलाला चावत असेल, तर हे पाहून तुम्हाला काळजी वाटू शकते. तुम्हाला प्रश्न पडेल, “माझं मुलं असं का वागत आहे?” किंवा “यात काहीतरी गंभीर आहे का?” पण काळजी करू नका! लहान मुलांमध्ये चावणे एक सामान्य टप्पा आहे आणि योग्य मार्गदर्शनाने ही सवय बंद करता येते.

Why Do Children Bite?

Children bite for various reasons, and understanding the cause can help in addressing the issue. Here are some common reasons:

1. Teething Pain (For Babies & Toddlers)

When babies are teething, their gums feel itchy and sore. Biting provides relief. If your baby is biting frequently, especially during this phase, it could simply be due to discomfort.

2. Exploration & Curiosity

Young children explore the world using their mouths. Just like they touch and feel objects, they sometimes bite to understand textures and sensations.

3. Expressing Emotions (Frustration, Anger, Excitement)

Toddlers don’t always have the right words to express emotions. When they feel overwhelmed, frustrated, or even overly excited, they may resort to biting as a way of expressing themselves.

4. Seeking Attention

If a child notices that biting gets a strong reaction from parents or caregivers, they might repeat the behavior to get attention, especially if they feel ignored or left out.

5. Imitation of Others

Children learn by watching others. If they see other kids biting, they might do the same without fully understanding the consequences.

6. Overstimulation or Stress

When children feel overstimulated in a crowded, noisy environment or are feeling stressed, they may bite as an impulsive response to cope with the situation.

मुलं चावत का? कारणं समजून घ्या

1. दात येण्याची प्रक्रिया (बाळ आणि लहान मुले)

बाळांचे दात येताना त्यांच्या हिरड्यांना खूप खाज आणि वेदना होतात. अशावेळी ते वस्तू किंवा माणसं चावतात कारण त्यांना त्यामुळे आराम वाटतो.

2. जग समजून घेण्याची उत्सुकता

लहान मुलं स्पर्श आणि चव याच्या मदतीने वस्तू समजून घेतात. त्यामुळे कधी कधी ते चावून गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

3. भावना व्यक्त करण्यासाठी (राग, निराशा, आनंद)

लहान मुलांकडे त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द नसतात. राग, निराशा किंवा खूप आनंद व्यक्त करण्यासाठी काही वेळा ते चावतात.

4. लक्ष वेधून घेण्यासाठी

कधी कधी मुलांना लक्ष वेधून घ्यायचं असतं, आणि त्यांना समजतं की चावल्यावर मोठ्या लोकांचा लगेच प्रतिसाद मिळतो. त्यामुळे ते वारंवार चावू लागतात.

5. इतर मुलांचं अनुकरण करणे

मुलं शिकण्याच्या प्रक्रियेत इतर मुलांचे वर्तन पाहतात. जर त्यांनी कोणाला चावताना पाहिलं, तर तेही नकळत तसं करतात.

6. तणाव किंवा गोंधळातून प्रतिक्रिया देणे

मुलं जेव्हा जास्त गोंगाट, गर्दी किंवा नवीन परिस्थितीत असतात, तेव्हा ते तणावाखाली येऊन चावण्याची कृती करतात.

What Can Parents Do to Stop Biting?

1. Stay Calm and Don’t Overreact

Children look to adults for reactions. If you yell or react aggressively, it might reinforce the behavior. Instead, take a deep breath and handle the situation calmly.

2. Teach Your Child to Express Emotions in Words

Encourage your child to use simple words like “I’m angry,” “I need help,” or “I’m sad” instead of biting. Teaching emotional expression can prevent frustration-based biting.

3. Offer a Teething Toy (For Babies & Toddlers)

If your baby is biting due to teething pain, provide a safe teething toy instead of letting them bite people.

4. Remove Attention from the Biting

If your child is biting to seek attention, avoid giving a big reaction. Instead, focus attention on the child who was bitten and calmly explain to your child that biting is not acceptable.

5. Set Clear & Simple Rules

Tell your child in a firm but gentle tone:
“Biting hurts. We use words, not teeth, to tell how we feel.”
Be consistent in reinforcing this rule.

6. Encourage Positive Social Interactions

Praise your child when they use words or gestures instead of biting. Encourage playdates and guide them in sharing and playing nicely with others.

7. Reduce Stress & Overstimulation

If your child bites when feeling overwhelmed, try to provide a calm environment. Give them quiet breaks or a cozy corner to relax when needed.

मुलं चावणे कसं थांबवायचं?

1. शांत राहा आणि जास्त प्रतिक्रिया देऊ नका

जर तुम्ही खूप मोठा राग व्यक्त केला, तर मुलाला हे आणखी लक्ष वेधण्याचे साधन वाटेल. म्हणूनच, शांत आणि संयमी राहा.

2. मुलांना शब्दांनी भावना व्यक्त करायला शिकवा

“माझा राग येतो,” किंवा “मी नाराज आहे,” असे साधे शब्द शिकवल्यास, मुलांना भावना चावण्याऐवजी बोलून व्यक्त करता येतील.

3. चावण्यास पर्याय द्या (लहान बाळांसाठी)

जर मुलं दात येण्यामुळे चावत असतील, तर त्यांना टिथर (teething toy) किंवा मऊ वस्तू चावायला द्या.

4. चावल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका

जर मुलं लक्ष वेधण्यासाठी चावत असतील, तर त्या क्षणी त्याकडे दुर्लक्ष करा आणि चावलेल्यावर लक्ष केंद्रित करा.

5. स्पष्ट आणि सरळ नियम सांगा

तुमच्या मुलाला स्पष्ट शब्दांत सांगा –
“चावणं चुकीचं आहे. चावल्यामुळे लोकांना त्रास होतो.”
हे नियम नेहमी स्पष्टपणे आणि सातत्याने सांगा.

6. चांगल्या वागणुकीचं कौतुक करा

जर मुलाने शांततेने भावना व्यक्त केल्या किंवा चावणं टाळलं, तर त्याचं कौतुक करा. सकारात्मक वर्तन वाढवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे.

7. मुलाला विश्रांती द्या आणि तणाव कमी करा

मुलं गोंधळात किंवा तणावाखाली असताना चावत असतील, तर त्यांना शांत कोपरा किंवा निवांत वेळ द्या.

What NOT to Do

Don’t Bite Back – Some parents think biting their child back will “teach them a lesson,” but this can confuse the child and reinforce bad behavior.

Don’t Shame the Child – Saying “You are bad!” can hurt their self-esteem. Instead, focus on correcting the behavior: “Biting hurts. We don’t do that.”

Don’t Ignore Frequent Biting – If biting continues even after trying these strategies, consult a pediatrician or child psychologist to understand if any deeper issue exists.

पालकांनी काय करू नये?

मुलाला परत चावू नका – काही पालक मुलाला शिकवण्यासाठी त्यालाच चावतात, पण यामुळे गोंधळ उडतो आणि चुकीचं वर्तन वाढू शकतं.

मुलाला दोष देऊ नका“तू वाईट आहेस!” असं न म्हणता, “चावणं चुकीचं आहे, आपण असं करू नये,” असं स्पष्ट सांगा.

ही सवय दुर्लक्षित करू नका – मुलं वारंवार चावत असतील, तर बालरोगतज्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

When to Seek Help?

Most children outgrow biting by the age of 3-4 years. However, if your child continues to bite frequently, seems aggressive, or struggles with social interactions, it’s a good idea to speak with a pediatrician for guidance.

मुलाच्या चावण्याची सवय कधी गंभीर आहे?

✅ जर मुलं तीन-चार वर्षांनंतरही चावत असतील,
✅ जर मुलं इतर मुलांशी आक्रमक वागत असतील,
✅ जर चावण्यासोबत इतर वर्तन समस्या दिसत असतील,

तर बालरोगतज्ज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Biting in children is a temporary phase that can be managed with patience, guidance, and understanding. As parents, your role is to teach them better ways to express emotions and interact with others. With love and consistency, your child will soon leave this habit behind.

चावणं ही एक तात्पुरती सवय आहे, जी योग्य मार्गदर्शनाने नक्कीच सुधारता येते. पालक म्हणून तुम्ही मुलाला भावना शब्दांत व्यक्त करायला शिकवा, लक्ष वेधण्याचे चांगले मार्ग द्या आणि प्रेमाने योग्य दिशा दाखवा.

Disclaimer:

  • The information provided in this blog post is for general knowledge and informational purposes only.
  • It is not intended as a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
  • Always consult with a qualified healthcare provider for any health concerns or before making any decisions regarding your health or the health of your child.  
  • The information in this blog post may change as new research and clinical experience accumulate.

काळजीपूर्वक लक्षात घ्या:

  • या ब्लॉग पोस्टमधील माहिती सामान्य ज्ञान आणि माहितीच्या उद्देशाने आहे.
  • हे व्यावसायिक वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचे पर्याय म्हणून मानले जात नाही.
  • आपल्या आरोग्याशी किंवा आपल्या मुलाच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी किंवा कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी नेहमी योग्य वैद्यकीय सेवा प्रदात्यांचा सल्ला घ्या.
  • नवीन संशोधन आणि क्लिनिकल अनुभव जमा होतात तसे या ब्लॉग पोस्टमधील माहिती बदलू शकते.

dr.suhassodal@gmail.com

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *